‘राज्यातील काँग्रेस आमदारांची संख्या कमी होणार’, भाजपच्या ‘या’ नेत्याने दिले संकेत
कर्नाटकासारखं महाराष्ट्रातही भाजपचं सरकार जावून काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला आहे. यावर बोलताना भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
भंडारा : कर्नाटकासारखं महाराष्ट्रातही भाजपचं सरकार जावून काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला आहे. यावर बोलताना भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कर्नाटकात दर पाच वर्षानी सरकार बदलतं.व्होटिंग टक्केवारी बघितल्यास भाजपला याही वेळेस तेवढीचं मतं मिळाली आहेत. 1985 चं सरकार सोडल्यास कर्नाटकात आतापर्यंत एकही सरकार रिपीट झालेलं नाही. दुसऱ्याच्या घरी पोरगा झाला आणि नाना पटोले नाचत आहेत. गेल्यावेळी महाराष्ट्रात काँगेसच्या 44 जागा निवडून आल्या होत्या, यावेळी तेवढे तरी निवडून येतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ते पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांच्या पक्षात काय चाललं आहे, हे सांगण्याची गरज नाही. पक्ष एकीकडे आणि नाना पटोले दुसरीकडे आहेत. म्हणून त्यांनी दिवसा स्वप्न बघू नये आणि लोकांनाही स्वप्न दाखवू नये. त्यांच्या साकोली विधानसभेत आता काय झालं आणि पुढे काय होणार आहे, हे लोकं बघणार आहेत’, अशी टीका परिणय फुके यांनी केली.