राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी परळी सज्ज, अबे! केवढा मोठ्ठा हार, तर कुठे हुरडा

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी परळी सज्ज, अबे! केवढा मोठ्ठा हार, तर कुठे हुरडा

| Updated on: Jan 18, 2023 | 10:53 AM

२००८ साली परप्रातीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाली होती. त्या अटकेचे परळीमध्ये तीव्र पडसाद उमटले होते.

परळी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS RAJ THACAKAREY ) आज बीड ( BEED ) येथील परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. 2008 साली परप्रातीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाली होती. त्या अटकेचे परळीमध्ये तीव्र पडसाद उमटले होते.

मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसेसची मोडतोड केल्यामुळे परळी येथे राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. कोर्टात सातत्याने गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

राज ठाकरे हे परळी कोर्टात हजर रहाण्यासाठी विशेष हेलिकॉप्टरने निघाले. औरंगाबाद येथे उतरून पुढील प्रवास ते कारमधून करणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी परळी सज्ज झाली असून 50 फुटांचा भला मोठा हार बनविण्यात आला आहे. तर, औरंगाबाद येथील कळशी मधील ऍग्रीकल्चर पार्क येथे हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.