Video | पत्राचाळ घोटाळा प्रकरणात Sharad Pawar यांचं नाव? काय आहेत आरोप?
2006 - 07 या काळात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी ज्या बैठका झाल्या, त्यात म्हाडाचे काही अधिकारी तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री आणि शरद पवार हेदेखील उपस्थित होते, असं ईडीच्या आरोपपत्रात म्हटल्याचं समोर आलं आहे.
कृष्णा सोनरवाडकर, मुंबईः पत्राचाळ घोटाळा (Patrachal) प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. ईडीने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रात शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावाचाही उल्लेख आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 2007 साली संजय राऊत (Sanjay Raut), तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री यांच्या नावाचा उल्लेख आरोप पत्रात असल्याचं म्हटलं जात आहे. 2006 – 07 या काळात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी ज्या बैठका झाल्या, त्यात म्हाडाचे काही अधिकारी तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेदेखील उपस्थित होते, असं स्पष्टपणे ईडीने आरोप पत्रात नमूद केलं आहे.
तसेच पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे प्रंट मॅन म्हणून काम करत होते. मात्र संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत असल्याचं ईडीने आरोपपत्रात म्हटलंय