Buldhana Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
बुलढाणा केसगळती प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भीतीपोटी नागरिकांनी अंघोळच करणं सोडलं आहे. केसगळतीच्या भीतीने गावातील कित्येक लोकांनी 8 दिवस अंघोळच केलेली नाही. प्रशासनाने शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बुलढाणा केसगळती प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भीतीपोटी नागरिकांनी अंघोळच करणं सोडलं आहे. केसगळतीच्या भीतीने गावातील कित्येक लोकांनी 8 दिवस अंघोळच केलेली नाही. प्रशासनाने शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जोपर्यंत शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत अंघोळ करणार नाही असं गावातील नागरिकांचं म्हणणं आहे. पाण्याची एवढी दहशत या गावातील लोकांमध्ये पसरली आहे की त्या पाण्याला हात लावायला देखील लोक घाबरत आहेत, त्या पाण्याने अंघोळ करणं तर दूरच राहिलं.
टक्कल वायरस च्या भीतीने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोंडगाव सह अनेक गावातील लोकांनी गेल्या चार ते पाच दिवसांपासून अंघोळच केली नाहीये. बोंडगाव, कठोरा, हिंगणा, भोनगाव सह 11 गावात गावात अचानक लोकांना केस गळती सुरू झाल्याने टक्कल पडू लागले. गावातील लोक वापरत असलेल्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्या योग्य नसल्याचं प्रशासन सांगून मोकळ झालं आहे. पण वापरण्यासाठी पर्यायी पाण्याची गावात व्यवस्था नसल्याने गावकरी आता अंघोळीपासून वंचित आहेत. शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं. त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरलं.