Aapla Bioscope Awards 2023 : लोकांचा इन्ट्रेस्ट नेमका कशात?; देवेंद्र फडणवीस यांचं मिश्किल विधान काय?

| Updated on: Dec 10, 2023 | 2:16 PM

टीव्ही 9 मराठीचा ‘आपला बायोस्कोप 2023’ हा पुरस्कार सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. मुंबईतल्या सहारा हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर होते.

मुंबई, १० डिसेंबर २०२३ : टीव्ही 9 मराठीचा ‘आपला बायोस्कोप 2023’ हा पुरस्कार सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. मुंबईतल्या सहारा हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शविली तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर होते. ‘आपला बायोस्कोप 2023’ या पुरस्काराच्या माध्यमातून मराठी मालिका आणि सिनेविश्वातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘आपला बायोस्कोप 2023’ याबद्दल काही मनोगत व्यक्त केलं. टिव्ही ९ मराठी अत्यंत वेगानं पुढे आलेलं हे चॅनल आहे, असे म्हणत असताना फडणवीस म्हणाले, कुठेही गेलं तरी tv9 चा कॅमेरामन उभाच असतो, त्यामुळे वैताग होतो. असं मिश्कील वक्तव्य केलं केल्याचे पाहायला मिळाले. तर टीव्ही 9 मराठीवर ७५ टक्के वेळ हा मनोरंजनला द्या अन् २५ टक्के वेळ हा बातम्यांसाठी द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

Published on: Dec 10, 2023 02:16 PM
मला ‘तो’ फोटो पाहूनच हसू आलं, मुख्यमंत्र्यांवर आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला
Deepfake Videos : राज ठाकरे यांची मुलगीही ट्रोल? शर्मिला ठाकरे म्हणाल्या, माझ्या मुलीलाही…