जनता निर्णय देईल तो शिवसेनेच्याच बाजूने, बाळासाहेब थोरात यांची मोठी प्रतिक्रिया

जनता निर्णय देईल तो शिवसेनेच्याच बाजूने, बाळासाहेब थोरात यांची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Feb 17, 2023 | 10:05 PM

कदाचित निवडणूक आयोगाने निर्णय दिला असेल परंतु जनता जो निर्णय घेईल तो उद्धवजींच्या बाजूने असेल. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनता निर्णय देईल.

संगमनेर : ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ठाकरे परिवाराने आपले संपूर्ण आयुष्य शिवसेना संघटना वाढवण्याकरता खर्ची घातलेले आहे. कदाचित निवडणूक आयोगाने निर्णय दिला असेल परंतु जनता जो निर्णय घेईल तो उद्धवजींच्या बाजूने असेल. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनता निर्णय देईल. खरे शिवसैनिक आणि जनता ही उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने असेल. हे तुम्हाला या निवडणुकांमध्ये दिसेल. खरं तर स्वायत्त संस्था यांची भूमिका निरपेक्ष असायला हवी होती. पण, असा का निर्णय घेतला हे कळत नाही अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Published on: Feb 17, 2023 10:05 PM