VIDEO | ‘त्यांची बडबड बंद केली पाहिजे’, भिडे गुरुजी वरून जोगेंद्र कवाडे सरकारवर बरसले
भिडे गुरुजी यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून राज्यात त्यांच्यावर टीकेची झोड कमी झालेली नाही.
अहमदनगर : 19 ऑगस्ट 2023 | पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी नगरमध्ये मविआ आणि उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यानंतर त्यांनी यांनी संभाजी भिडे यांच्यावरही टीकास्र सोडलं. यावेळी, भिडे गुरुजी हे राज्यात दंगलखोर म्हणून प्रसिद्ध आहेत. सांगली, पुण्यामध्ये त्यांनी अनेक दंगली घडून आणल्या आहेत. त्याबरोबरच वारकऱ्यांमध्ये देखील शस्त्र घेऊन जाण्याचा प्रयत्न भिडे गुरुजींनी केलाय. त्यामुळे त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. त्यांची बडबड बंद केली पाहिजे अशी मागणी कवाडे यांनी केली आहे. त्याचबरोबर इतर कोणी असं केल्यास त्याच्यावर कडक कारवाई होते, मग या वेळेवर या माणसावर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला आहे. तर कवाडे यांनी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना अजून सरकार पकडत नाही. दुसऱ्या देशातून आरोपी आणण्याची क्षमता असून हे मारेकरी का पकडले जात नाहीत अशी खंत देखील बोलून दाखवली आहे.