अजित पवार गट अडचणीत येणार? शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका

अजित पवार गट अडचणीत येणार? शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका

| Updated on: Aug 07, 2023 | 10:30 AM

आता शरद पवार निवडणूक आयोगाकडे पोहचले आहे.शरद पवार गटाने अजित पवार यांनी दाखल केलेली याचिका अकाली आणि दुर्भाग्यपुर्ण असल्याचं म्हटलं.

मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | अजित पवार यांनी आपल्या काही आमदारांसह राष्ट्रवादीत बंडखोरी केली. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. शरद पवार यांना झटका देत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजित पवार गटाकडे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर अजित पवार यांनी पुढचे पाऊल टाकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.त्यानंतर आता शरद पवार निवडणूक आयोगाकडे पोहचले आहे.शरद पवार गटाने अजित पवार यांनी दाखल केलेली याचिका अकाली आणि दुर्भाग्यपुर्ण आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा उल्लेख नाही, किंवा तसा पुरावाही त्यांच्याकडे नाही, यामुळे अजित पवार गटाने केलेली मागणी फेटाळा, असे शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.