महाराष्ट्राच्या राजधानीला वेठीस धरताय? मनोज जरांगे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

| Updated on: Jan 08, 2024 | 5:47 PM

मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २० जानेवारीला मुंबईत आंदोलन करू नये, यासाठी याचिकाकर्त्यानं ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. ते म्हणाले, 'मनोज जरांगे यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केली तेव्हा सरकारने त्यांच ऐकलं. मात्र आता...'

Follow us on

मुंबई, ८ जानेवारी २०२४ : येत्या २० जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांसह मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार असल्याचे म्हणत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत शेवटचं आंदोलन करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या आमरण उपोषणापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २० जानेवारीला मुंबईत आंदोलन करू नये, यासाठी याचिकाकर्त्यानं ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. ते म्हणाले, ‘मनोज जरांगे यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केली तेव्हा सरकारने त्यांच ऐकलं. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईला वेठीस धरायला निघाले आहे. त्याला आम्ही आक्षेप घेतलाय आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.’