पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप Cardiac Ambulance मधून मतदानासाठी रवाना
मतदानाला निघण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विजयाचे चिन्ह दाखवत माध्यम प्रतिनिनिधना सकारात्मक प्रतिसाद दिला.भाजपासाठी एक मत महत्त्वाचे असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे.
पुणे – राज्यात राज्यसभा निवडणकीसाठी आज मतदान होत आहे. या मतदानासाठी पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) दीर्घ आजाराने ग्रस्त असतानाहि मतदान करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. कार्डियाक रुग्णवाहिकेतून (Cardiac Ambulance)आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड ते मुंबई असा बाय रोड प्रवास करून मतदानासाठी(voting) रवाना झाले आहेत. मतदानाला निघण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विजयाचे चिन्ह दाखवत माध्यम प्रतिनिनिधना सकारात्मक प्रतिसाद दिला.भाजपासाठी एक मत महत्त्वाचे असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे. कार्डियाक रुग्णवाहिकेतून संपूर्ण प्रवास केला.
Published on: Jun 10, 2022 12:06 PM
Latest Videos