भाताची शास्त्रीय पद्धतीनं भात लावणी! विद्यार्थिनींच्या व्हिडिओची सगळीकडे चर्चा

भाताची शास्त्रीय पद्धतीनं भात लावणी! विद्यार्थिनींच्या व्हिडिओची सगळीकडे चर्चा

| Updated on: Jul 21, 2022 | 12:48 PM

कृषी (Agriculture) हा विषय आहे जिथे प्रत्यक्षात दाखवून शिकवलं जायला हवं कारण त्याचा गाभाच प्रात्यक्षिकांवर आधारित आहे. असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय

गोंदिया: शाळांमध्ये कायमच विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मजेशीर प्रकारे शिकवणं आणि सर्वात महत्त्वाचं प्रात्यक्षिक दाखवून शिकवणं लक्षात राहील असं असतं हे संशोधनच सांगतं. कृषी (Agriculture) हा विषय आहे जिथे प्रत्यक्षात दाखवून शिकवलं जायला हवं कारण त्याचा गाभाच प्रात्यक्षिकांवर आधारित आहे. असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय ज्यात विद्यार्थिनी शास्त्रीय पद्धतीने रोवणी करतायत. डव्वा निवासी शाळेचा हा आगळावेगळा उपक्रम आहे. शेतात जावून शालेय विद्यार्थींनींनी शास्त्रीय रोवणी पद्धतीने भात रोवणी केलीये. गोंदिया जिल्ह्यातील (Gondia City) सडक अर्जुनी तालुक्यात येत असलेल्या डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थीनींनी चक्क शेतकऱ्यांच्या शेतात जावून शास्त्रीय पद्धतीने भात रोवणी केली. तर यावेळी शिक्षकांकडून भात रोवणीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण विद्यार्थीनींना देण्यात आले. या शाळेने राबविलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची जिल्हाभर चर्चा आहे