Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस आली अन् प्रवाशी झपझप चढले; पुढे बसचं काय झालं? पाहा...

बस आली अन् प्रवाशी झपझप चढले; पुढे बसचं काय झालं? पाहा…

| Updated on: Aug 03, 2023 | 9:08 AM

कधी छप्पर उडालेली बस रस्त्यावर धावते तर कधी प्रवाशांच्या वजनानं महापालिकेची बस धावते. मात्र अपघात घडल्यास जबाबदार कोण? वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचा धोकादायक प्रवास समोर आला आहे.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | कधी छप्पर उडालेली बस रस्त्यावर धावते तर कधी प्रवाशांच्या वजनानं महापालिकेची बस धावते. मात्र अपघात घडल्यास जबाबदार कोण? वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचा धोकादायक प्रवास समोर आला आहे. प्रवाशाना घेऊन जाणारी बस एका बाजूला झुकून रस्त्यावर धावतेय. या बसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वसईहून नालासोपारा जाणाऱ्या या बसचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने काढला आहे. प्रवाशांनी भरलेल्या या बसचा अपघात होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.त्यामुळे वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा अशा बसेस सेवेत ठेवून प्रवाशांच्या जीवाशी खेळतेय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Published on: Aug 03, 2023 09:08 AM