ऑस्ट्रेलियातून परत आणलेल्या पुरातन वस्तूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाहणी

ऑस्ट्रेलियातून परत आणलेल्या पुरातन वस्तूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाहणी

| Updated on: Mar 21, 2022 | 11:33 AM

ऑस्ट्रेलियातून (Australia) भारतात आणल्या गेलेल्या 29 प्राचीन मूर्तींची (29 antiquities) पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केली आहे.

ऑस्ट्रेलियातून (Australia) भारतात आणल्या गेलेल्या 29 प्राचीन मूर्तींची (29 antiquities) पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केली आहे. या मूर्तींचे थिमनुसार सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. या मूर्तींमध्ये विविध देवी देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती अतिशय प्राचीन कालखंडामधील आहेत. ज्यामध्ये भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य, जौन परंपरांशी संबंधित असलेल्या मूर्ती, प्राचीन काळात गृहसजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या मूर्ती आणि भारतातील विविध राज्यांच्या सांस्कृतीक वारश्याची जाणीव करून देणाऱ्या मूर्तींचा समावेश आहे. यातील एका मूर्तीमध्ये भगवान शंकर हे आपल्या शिष्यांसोबत सवांद साधत असलेला प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. या मूर्ती खडक, संगमरवर तसेच कास्य, पितळाच्या धातूपासून बनवण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या मूर्ती भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगाना आणि पश्चिम बंगाल या राज्यातील संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.

Published on: Mar 21, 2022 11:33 AM