एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिवसेनेचा उल्लेख; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी युती…”
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एनडीएच्या खासदारांची काल अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख करत आपली भूमिका मांडली.
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट 2023 | नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एनडीएच्या खासदारांची काल अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख करत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि आमची युती ही खूप मजबूत होती. पण आम्ही त्यांना दूर केलं नाही तर ते आमच्यापासून दूर गेले.उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी असलेली युती तोडली. आम्ही तोडली नाही. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही”, असंही मोदी या बैठकीत म्हणाले. 2014 पासून शिवसेना एनडीएसोबत सत्तेत असतानाही ‘सामना’मधून वारंवार टीका केली जात होती. मात्र आम्ही त्यांना प्रतिउत्तर दिलं नाही.” दरम्यान, या बैठकीत मोदींनी खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या.