“लोकमान्य टिळक भारतीयांच्या कपाळावरील टिळा”, पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून केली भाषणाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. लोकमान्य टिळक यांच्या ओळख असलेली पुणेरी पगडी यावेळी पंतप्रधानांना घालण्यात आली. पुरस्काराचं सन्मानपत्र, ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीत भगवत गीता, लोकमान्यांची पगडी, केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा आहे. नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी टिळक पुरस्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी काशी आणि पुण्याचं साम्य देखील सांगितलं.
Published on: Aug 01, 2023 02:25 PM
Latest Videos