एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक ट्विट केलं. या ट्विटला रिप्लाय देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
नवी दिल्ली, 23 जुलै 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली. “देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे,” असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या ट्विटला रिप्लाय देत त्यांचं कौतुक केलं आहे.
Published on: Jul 23, 2023 02:01 PM
Latest Videos