PM Narendra Modi : संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार
Nagpur News : पंतप्रधान मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहे. यावेळी माधव नेत्रालायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.
आपला संघ असा संस्कार यज्ञ आहे. जो अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टीसाठी आपण माधव नेत्रालयला पाहतो. आणि अंतरदृष्टीने संघाला सेवेचा पर्याय दिला आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना काढले आहेत.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, विदर्भातील महान संत गुलाबराव महाराज यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. तरीही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलं. दिसत नसतानाही त्यांनी एवढी पुस्तकं कशी लिहिली. त्यांच्याकडे नेत्र नव्हते. पण दृष्टी होती. ही दृष्टी बोधातून येते. विवेकातून प्रकट होते. ही दृष्टी व्यक्तीसोबत समाजाला शक्ती देते. कोणतंही कार्यक्षेत्र असेल सीमावर्ती गाव असेल डोंगराळ भाग असेल, वनक्षेत्र असेल संघाचे स्वयंसेवक निस्वार्थी भावनेने काम करत असतात. कोणी वनवासी क्षेत्रात काम करत आहे. कोणी आदिवासी मुलांना शिकवत आहे. कोणी वंचितांची सेवा करत आहे. तर कोणी शिक्षणाचं काम करत आहे. प्रयागमध्ये नेत्रकुंभात स्वयंसेवकांनी लाखो लोकांची मदत केली. म्हणजे जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक आहे. आपत्ती आली, पूर आला, भूकंप आला स्वयंसेवक एक शिपायासारखा तिथे पोहोचतो. तो आपली पीडा पाहत नाही. फक्त सेवा भावनेने आपण कामात जोडतो. आपल्या हृदयातच सेवा हे अग्निकुंड आहे, असंही यावेळी मोदींनी म्हंटलं.