Narendra Modi | पंढरपूरची सेवा ही साक्षात नारायणाची सेवा, नरेंद्र मोदी LIVE
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडला.
वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून पार पडला आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहिले आहेत. या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. महत्वाची बाब म्हणजे या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष समर्पित पदपथ बांधला जाणार आहे.
Published on: Nov 08, 2021 06:29 PM