‘मी पूजा केली तर…’, सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतरच्या वादावर काय म्हणाले मोदी?

| Updated on: Sep 20, 2024 | 3:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींना गणेशोत्सवात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती करत दर्शन घेतलं. यानंतर विरोधकांनी मोदींवर टीका केली. मोदींनी गणपती पूजेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे चांगलेच वाभाडे काढले. बघा काय म्हणाले नरेंद्र मोदी?

Follow us on

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणोशोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली होती. दरम्यान, धनंजय चंद्रचूड आणि त्यांच्या कुटुंबीयांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दुसरीकडे विरोधक देखील टीका केली होती. यावर मोदी यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. ‘काँग्रेसला गणपती पूजेची प्रचंड चीड आहे. मी गणेश पूजेला गेलो होतो. तेव्हा काँग्रेसने लगेच तुष्टीकरण सुरू केलं. काँग्रेसने माझ्या गणपती पूजेलाही विरोध केला आहे. लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस काहीही करत आहे’, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ‘ज्या पार्टीत आपल्या अस्था असेल ती पार्टी गणपती पूजेचा विरोध करणार नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पूजेला विरोध आहे. मी गणेश पूजेला गेलो तर काँग्रेसचं तुष्टीकरण सुरू झालं, असे मोदी म्हणाले तर कर्नाटकात काँग्रेसने गणपतीला तुरुंगात टाकलं. गणपतीची लोक पूजा करत होते. ती मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवली होती. महाराष्ट्र गणपतीची पूजा करत होता आणि कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये होती. याघटनेमुळे गणपतीचा अपमान झाला आणि देशाला धक्का बसला आहे. काँग्रेसचे सहकारीही गप्प आहे. त्यांना काँग्रेसचा रंग चढलाय. गणपतीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला सवाल विचारण्याची हिंमत त्यांच्यात राहिली नाही, असे म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे.