PM Narendra Modi Emotional : डॉक्टरांशी बोलताना मोदी भावूक, लेकरांची काळजी घेण्याचाही सल्ला

| Updated on: May 21, 2021 | 2:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला.