Pune PM Modi | देवेंद्र फडणवीस नेमकं अजित पवारांना काय सांगतायत?

Pune PM Modi | देवेंद्र फडणवीस नेमकं अजित पवारांना काय सांगतायत?

| Updated on: Mar 06, 2022 | 12:40 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज पुण्यात आहेत. मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या (pune corporation) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज पुण्यात आहेत. मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या (pune corporation) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी पुण्यातील पहिल्या मेट्रोला (metro) हिरवा कंदिल दाखवला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते हजर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर पंतप्रधानांच्या आजूबाजूलाच होते. मेट्रोच्या उद्घाटनावेळी तर हे दोन्ही नेते मोदींच्या बाजूला होते. त्यावेळी पुढे जाण्यासाठी दोन्ही नेते एकमेकांना करत होते. राजकारणात एकमेकांवर टीका करणारे दोन्ही नेते जेव्हा एकमेकांबद्दल आदर दाखवतानाचं चित्रं दिसलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र सुखावून गेला. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती परिपक्व आणि सभ्य आहे याची प्रचितीही यावेळी आली.

Published on: Mar 06, 2022 12:40 PM