संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पटना दौऱ्यात हल्ल्याचा कट असल्याची माहिती समोर आली आहे. PFI वरच्या कारवाई दरम्यान ही माहिती समोर आली आहे. 12 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या (Bihar) पटनामध्ये होते. यावेळी हल्ल्याचा कट आखला असल्याची माहिती आहे. तपास यंत्रणांनी PFI च्या हस्तकांवर कारवाई केली. तेव्हा चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे.