Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

PM Narendra Modi : आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

| Updated on: Mar 28, 2025 | 6:26 PM

TV9 Network What India Think Today : टीव्ही9 नेटवर्कच्या मेगा इव्हेट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’मध्ये बोलताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांत भारताने केलेल्या गौरवशाली कामगिरीचा उल्लेख केला.

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करते. आम्ही टॅक्स सिस्टिमला टॅक्स पेयर फ्रेंडली केलं. सीएच्या मदतीशिवाय आयटीआर करता येत नव्हतं. आता आपण आयटीआर फाईल करत आहोत. लगेच काही दिवसात रिफंड येत आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीव्ही9 नेटवर्कच्या मेगा इव्हेट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’मध्ये बोलताना आज व्यक्त केल्या आहे. यावेळी गेल्या काही वर्षांत भारताने केलेल्या गौरवशाली कामगिरीचा उल्लेख देखील पंतप्रधान मोदी यांनी केला.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या १०-११ वर्षात भारत प्रत्येक सेक्टरमध्ये बदलला आहे. विचारांचा बदल झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने लोकांना विचार करायला भाग पाडलं. पूर्वी विदेशी वस्तूच मागितल्या जायच्या. आता मेड इन इंडिया वस्तू खरेदी केल्या जात आहे. हा विचार बदलला. सरकार जास्तीत जास्त लोकांना मिनिस्ट्रीत घेण्याचा प्रयत्न करते. पण आमच्या सरकारने पहिल्याच कार्यकाळात मंत्रालयायचं विलय केलं आहे. वेगवेगळी मंत्रालये एकत्र केली. पररराष्ट्र मंत्रीमंडळ वेगळं होतं. ते जोडलं. जलसंसधान आणि पेयजल एकत्र करून जलशक्ती मंत्रालय केलं. आम्ही राजकीय मजबुरी शिवाय देशाचे रिसोर्सेस महत्त्वाचे मानले. १५०० कायदे संपवले. ४० हजार कंप्लायन्सीस हटवले. त्यामुळे जनतेला हॅरेसमेंटमधून मुक्ती मिळाली. सरकारी मशिनरीची एनर्जी वाचली. जीएसटीतून ३० टॅक्सेसला मिळून एक टॅक्स केला. त्यामुळे बराच फरक पडला. करप्शन थांबवलं. आम्ही ईमार्केटचा प्लॅटफॉर्म तयार केला. टेंडर प्रक्रिया सुलभ केली. सरकारला 1 लाख कोटीचा फायदा झाला असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं.

Published on: Mar 28, 2025 06:26 PM