PM Narendra Modi : ‘आपल्या सर्वांना…’, पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
आज पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माधव नेत्रालाय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यात बोलताना पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा.. असं म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मराठीमधून केल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. आज पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माधव नेत्रालाय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यात मोदी बोलत होते.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, आजपासून नवरात्रीचा पवित्र पर्व सुरू होत आहे. देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात आज गुढीपाडवा, उगादीचा उत्सव सुरू आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरु अंगत देव यांचा अवतरण दिवसही आहे. आपले प्रेरणापूंज डॉ. हेडगेवार यांच्या जयंतीचंही निमित्त आहे. संघाच्या गौरवशाली प्रवासाला १०० वर्षही पूर्ण होत आहे. आज या निमित्ताने मला स्मृती मंदिरात जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी मिळाली. आपण संविधानाच्या ७५ वर्षाचा उत्सव साजरा केला आहे. पुढच्या महिन्यात बाबासाहेबांची जयंती आहे. मी दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना नमन केला आहे. या विभूतींना नमन करताना देशवासियांना नवरात्री आणि सर्व पर्वांची शुभेच्छा देतो.
नागपूरमध्ये आज आपण एक पुण्य संकल्पाच्या विस्ताराचे साक्षी बनत आहोत. आपण माधव नेत्रालयाचा विस्तार करत आहे. मानवतारत हे सेवा मंदिर आहे. कणाकणात देवालय आहे. माधव नेत्रालय ही एक अशी संस्था आहे जी अनेक दशकांपासून गुरुजींच्या आदर्शांवर लाखो लोकांची सेवा करत आहे. लोकांच्या जीवनात प्रकाश आला आहे. त्याच्या नव्या परिसराचा शिलान्यास झाला आहे. या नव्या परिसरानंतर या सेवाकार्याला अधिक गती मिळेल. या मुळे हजारो नव्या लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल. त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होईल, असा विश्वास यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा

'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
