पंतप्रधान मोदी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार; प्रशासनाकडून तयारी सुरु!
येत्या 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नेरंद्र मोदी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार आहे. यावेळी ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा देखील करणार आहेत.
पुणे, 27 जुलै 2023 | येत्या 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नेरंद्र मोदी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार आहे. यावेळी ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा देखील करणार आहेत. मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील पोलिसांकडून मंदिराची पाहणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारकचा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकापर्ण सुद्धा होणार आहेत.
Published on: Jul 27, 2023 09:12 AM
Latest Videos