मुंबईत आहात? कामानं बाहेर पडताय? पण लोकल तर उशिरा धावतेय; नेमकं कारण काय?
रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर लोकल धावत असते. त्यामुळे येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना ती आपलीशी वाटते. ती त्यांना त्यांच्या अचूक ठिकाणी वेळेत पोहचवण्याचे काम करते. मात्र हिच लोकल उशिरा धावत आहे.
मुंबई : मुंबईची लाईफ लाईन म्हणून मुंबई लोकलकडे पाहिलं जातं. रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर लोकल धावत असते. त्यामुळे येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना ती आपलीशी वाटते. ती त्यांना त्यांच्या अचूक ठिकाणी वेळेत पोहचवण्याचे काम करते. मात्र हिच लोकल उशिरा धावत आहे. ज्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट स्थानकावर पॉईंट्स फेल्युअर झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा उशिरा होत आहे. येथे जलद मार्गावर लोकल 15 ते 20 मिनिट उशिरा धावत आहे. तर कालही मुंबईत जोरदार वारे वाहत असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याने 3 तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.
Published on: Jun 12, 2023 02:26 PM
Latest Videos