चोरी-छुप्यारीने नायलॉन मांजा विकताय, तर खबरदार; पोलीसांची करतायत कारवाई
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंग उडविले जातात. मात्र पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर केला जातो. याविरोधात आता नाशिक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे
नाशिक : मकरसंक्रांती आता काहीच दिवसांवर आली आहे. त्यामुळे तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला या शुभेच्छा आता ऐकायला मिळतील. त्याचबरोबर अबाल वृद्ध हे पतंग उडविण्याची मजा लूटतील. पण याच पतंगाच्या मांजामुळे अनेकांचे जिवन धोक्यात पडत आहे. त्याविरोधात आता पोलीसच मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सावधान नायलॉन मांजा विकणाऱ्यानो…
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंग उडविले जातात. मात्र पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर केला जातो. याविरोधात आता नाशिक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही चोरी-छुप्यारीतीने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू केली आहे.
नायलॉन मांजा अनेकांना गंभीर दुखापतींना समोरे जावे लागत आहे. त्यावरूनच पोलीसांनी पतंग विक्री करणाऱ्यांसह चोरी-छुप्यारीतीने मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलीसांनी छापेमारी करण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर साठा करणाऱ्यांना कठोर कारवाईचे संकेत शहर पोलिसांनी दिले आहेत