शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगडवर शिवभक्तांवर लाठीचार्ज? नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगडवर शिवभक्तांवर लाठीचार्ज? नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 06, 2023 | 3:52 PM

या सोहळ्याला 2 लाख हुन अधिक शिवभक्त किल्ले रायगडावर जमा झाले होते. तर रायगडावर पायी जाण्यास किल्ल्याचे दरवाजे पोलिसांनी बंद केले होते. तरिही किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनची गर्दी झाली होती. तर सोहळा संपल्यानंतर रायगडावरून खाली जाण्याकरता किल्ल्याच्या मार्गावर शिवभक्तांनी एकच प्रचंड गर्दी केली.

रायगड : किल्ले रायगडावर आज तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 शिवराज्याभिषेक सोहळा हा संपन्न झाला. या सोहळ्याला 2 लाख हुन अधिक शिवभक्त किल्ले रायगडावर जमा झाले होते. तर रायगडावर पायी जाण्यास किल्ल्याचे दरवाजे पोलिसांनी बंद केले होते. तरिही किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनची गर्दी झाली होती. तर सोहळा संपल्यानंतर रायगडावरून खाली जाण्याकरता किल्ल्याच्या मार्गावर शिवभक्तांनी एकच प्रचंड गर्दी केली. त्यामुळे गर्दी अवरण्याकरता स्वःत छत्रपती संभाजीराजे हे शिवभक्तांना आवाहन करत होते. परंतु शिवभक्तांनी त्यांचे आव्हान धुडकावून लावले. तर या जमलेल्या प्रचंड गर्दीत धक्काबुक्की मोठ्या प्रमाण वाढल्यानंतर पोलिसांनी शिवभक्तांनवर सौम्य प्रमाणात लाठीचार्ज हा केला. तर हळूहळू सर्व शिवभक्तांना किल्ल्यावरून खाली पायवाटेने सोडण्यात येत आहे.

Published on: Jun 06, 2023 03:49 PM