‘शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत… ,’ काय म्हणाले वैभव नाईक ?
मालवणातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण सुरु झाले होते. आता या प्रकरणात ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना नेते वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या नोटीसीत काय होते याचा खुलासा वैभव नाईक यांनी केला आहे. वैभव नाईक यांनी खरे तर शिवरायांचा पुतळा हा भ्रष्टाचारामुळे कोसळला हे सत्य आहे. तुमच्याकडे या संदर्भात काय पुरावे आहे असे पोलिसांना आपल्याकडून मागितले आहेत. या प्रकरणात ज्यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे त्यांच्यावर खरेतर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्यानंतर जो अहवाल आज वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला आहे त्यातच म्हटले आहे. निकृष्ट गंजलेली साधन सामुग्री वापरल्याने, लोखंडाचा वापर केल्याने तसेच चुकीच वेल्डींग केल्याने हा पुतळा कोसळल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. पुतळ्याचे बिल ज्यावेळी अदा केले त्यावेळी पुतळ्याची पाहणी करुनच बिल अदा केले पाहीजे होते. त्यावेळी कोणाचा दबाव होता हे खरे तर पोलिसांनी तपासले पाहीजे होते असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. खरे या प्रकरणात आपटे आणि पाटील या दोघांना पकडले आहे. आपटे आठ दिवसांनी त्याच्या घरीच सापडला, असे कधी झालेले नाही. या प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत पोलिस पोहचलेलेच नाहीत हे सर्व संशयास्पद असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.