हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देशमुख कुटुंबाला आश्वासन

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देशमुख कुटुंबाला आश्वासन

| Updated on: Dec 21, 2024 | 6:02 PM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर लागलीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मस्साजोग येथे जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.

बीडच्या मस्साजोग गावाचे नुकतीच निघृण हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या पिडीत कुटुंबियांची शरद पवार यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यानंतर अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लागलीच देशमुख कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात अजिबात म्हणजे अजिबात कोणालाच पाठीशी घातले जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा केली जाणार नाही. देशमुख यांच्या मुलीच्या आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलू तसेच या प्रकरणातला तपास अहवाल जसा..जसा पुढे जाईल त्याचा रिपोर्ट कुटुंबाला दिला जाईल असेही आश्वासन अजितदादांना यावेळी दिले. तसेच कोणीही घाबरु नये हवा तर संपूर्ण गावात पोलिस बंदोबस्त दिला जाईल असेही अजितदादांनी यावेळी सांगितले.

Published on: Dec 21, 2024 06:01 PM