Nashik : हनुमान चालीसा लावण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
नाशिकच्या मंदिरात हनुमान चालीसा लावण्यासाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भोंग्यावरून राजकारण तापले आहे, भोंग्याच्या विरोधात मनसे सैनिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांची धडपकड सुरू आहे. तसेच मनसेच्या अनेक बड्या नेत्यांना या सर्व पार्श्वभूमीवर नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. दम्यान दुसरीकेडे नाशिकच्या जबरेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घतेले आहे. तसेच त्यांच्याकडील भोंग्यासह इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.
Latest Videos