Special Report | पुण्याचं राजकारण पश्चिम बंगालच्या दिशेनं?

Special Report | पुण्याचं राजकारण पश्चिम बंगालच्या दिशेनं?

| Updated on: May 26, 2022 | 10:56 PM

राजकारणात आता बदल्याची भावना दिसून येऊ लागली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच परिस्थिती शहरातल्या राजकारणात पाहायला मिळते आहे.

राजकारणात आता बदल्याची भावना दिसून येऊ लागली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच परिस्थिती शहरातल्या राजकारणात पाहायला मिळते आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण थेट हाणामारीपर्यंत पोहचले आहे. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात गँगवारने डोकं वर काढलं होते. एकमेकांवर तुटून पडणे, एकमेकांच्या गँगमधील लोकांवर बदला घेणे, तिच परिस्थिती सध्या राजकारणात दिसून येते आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Published on: May 26, 2022 10:56 PM