सोलापूर किंवा कोल्हापुरचे महत्त्व शरद पवार यांनी सांगितलं; काय आहे या जिल्ह्यात?

सोलापूर किंवा कोल्हापुरचे महत्त्व शरद पवार यांनी सांगितलं; काय आहे या जिल्ह्यात?

| Updated on: May 08, 2023 | 11:24 AM

शरद पवार यांनी आपण फक्त पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक चिंतेत होते. कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे राजीनामा मागे घेतल्याचे सांगतलं तर आपण आपल्या दौऱ्याची सुरूवात कोल्हापूर किंवा सोलापूरने का करतो याचे उत्तर ही दिलं.

सोलापूर : राजीनाम्याच्या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सोलापूर (Solapur) जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सोलापूरच्या दौऱ्यावर राजकीय गणितं मांडली जात आहेत. अशातच शरद पवार यांनी आपण फक्त पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक चिंतेत होते. कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे राजीनामा मागे घेतल्याचे सांगतलं तर आपण आपल्या दौऱ्याची सुरूवात कोल्हापूर किंवा सोलापूरने का करतो याचे उत्तर ही दिलं. पहिल्यापासून शरद पवार यांचे कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यावर मनापासून प्रेम असल्यानं ते तेथून त्यांच्या दैऱ्याची सुरूवात करतात. तर त्यांचे सोलापूरवर कायम बारीक लक्ष असतं. तर सोलापूरची माती ही सामान्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम करते. त्यामुळे आताही समाधानी आहे. येथे कार्यकर्त्यांना भेटता आलं. त्यांचा उत्साह पाहता आला.

Published on: May 08, 2023 10:35 AM