कोल्हापुरातील आंदोलनावरून राजकीय प्रतिक्रिया, मविआचा शिंदे सरकारवर आरोप, तर फडणवीस म्हणतात...

कोल्हापुरातील आंदोलनावरून राजकीय प्रतिक्रिया, मविआचा शिंदे सरकारवर आरोप, तर फडणवीस म्हणतात…

| Updated on: Jun 07, 2023 | 12:59 PM

एका आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा सुरू असताना पोलिसांनी मोर्चावर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला. या संपूर्ण घटनेवर राजकीय नेत्यांनी प्रतक्रिया दिली आहे.

कोल्हापूर : एका आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा सुरू असताना पोलिसांनी मोर्चावर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला. या संपूर्ण घटनेवर राजकीय नेत्यांनी प्रतक्रिया दिली आहे. मविआ सरकारच्या काळात अशा गोष्टी घडल्या नाहीत, पण गेल्या सात-आठ महिन्यात दंगलीच्या अनेक घटना घडत आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर सत्ताधारी वर्ग अशा गोष्टीला प्रोत्साहित करतोय, हे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच औरंगजेबाच्या विरोधात उदात्तीकरण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करू, असं फडणवीस म्हणाले.

Published on: Jun 07, 2023 12:59 PM