Politics: शिंदेंच्या सुरक्षेवरून घमासान!

| Updated on: Jul 23, 2022 | 3:05 PM

ठाकरे सरकारच्या काळात एकनाथच शिंदेंच्या सुरक्षा मुद्यावरून आता घमासान सुरु झाले आहे. एकनाथ शिंदेंना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. शिंदेंना नक्षलवाद्यांकडून धमकी आल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली होती, असे वक्तव्य माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांनी केले. शिंदे गटाकडून सुरक्षा काढल्या गेल्याचा आरोप खोटा आहे असेही ते म्हणाले. याबद्दल मुख्यमंत्री […]

ठाकरे सरकारच्या काळात एकनाथच शिंदेंच्या सुरक्षा मुद्यावरून आता घमासान सुरु झाले आहे. एकनाथ शिंदेंना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. शिंदेंना नक्षलवाद्यांकडून धमकी आल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली होती, असे वक्तव्य माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांनी केले. शिंदे गटाकडून सुरक्षा काढल्या गेल्याचा आरोप खोटा आहे असेही ते म्हणाले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मला अनेकदा नक्षलवाद्यांकडून धमक्या आलेल्या आहेत, पण मी त्यांना कधीही भीक घातली नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. धमकी मिळाल्यानंतर झेड प्लेस सुरक्षेची शिफारस केली होती असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Published on: Jul 23, 2022 03:05 PM