VIDEO | राज्यात दोन लोकसभेच्या दोन जागा रिक्त; पोटनिवडणुकींना वेग? आयोगाची कसली गडबड?
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला गती येताना दिसत होती. त्याचदरम्यान धानोरकर यांचे निधन झाल्याने आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक लागणार आहे. त्यामुळे पुणे आणि चंद्रपूर येथे पोटनिवडणूक कधी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर : काही महिन्यांपुर्वी पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट आणि त्यानंतर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. यामुळे भाजप आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. याचदरम्यान पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला गती येताना दिसत होती. त्याचदरम्यान धानोरकर यांचे निधन झाल्याने आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक लागणार आहे. त्यामुळे पुणे आणि चंद्रपूर येथे पोटनिवडणूक कधी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्य निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कारण लवकरच या मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर या पत्रात निवडणुकीसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या पत्रात ज्या साहित्याची गरज आहे, त्याचा तात्काळ आढावा घेऊन मागणी करण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.