या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे गटाला काय?
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मदत करणाऱ्या शिंदे गटाच्या काही चेहऱ्यांना देखिल या विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार याकडेही राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : अनेक दिवसांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत होत्या. त्यावर आता जानेवारी अखेर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील काही चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये अंतिम फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा फेरबदल जानेवारी अखेरीपर्यंत कधीही होऊ शकतो.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मदत करणाऱ्या शिंदे गटाच्या काही चेहऱ्यांना केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार याकडेही राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.