अजित पवार यांनी महाराष्ट्र हादरवला? ‘राज-उद्धव ठाकरे एकत्र या....’ शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

अजित पवार यांनी महाराष्ट्र हादरवला? ‘राज-उद्धव ठाकरे एकत्र या….’ शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

| Updated on: Jul 03, 2023 | 9:22 AM

अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याचदरम्यान शिवसेना भवनासमोर लागलेल्या पोस्टरमुळे सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काल महाराष्ट्रात राजकीय भूंकप आणला. त्यांनी आपल्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा आधीच दिला होता. तर काल थेट आपल्या काही आमदारांसह राजभवनला पोहचत शपथ विधीच आटोपला. आधी पहाटेचा त्यानंतर काल दुपारचा. यामुळे अख्या महाराष्ट्रच हादरला. अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याचदरम्यान शिवसेना भवनासमोर लागलेल्या पोस्टरमुळे सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे अशी मागणी करणारे पोस्टर लावले गेले आहेत. तर हे मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत. त्यामुळे अधिक चर्चा होताना दिसत आहे. मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावलेल्या या पोस्टरमध्ये महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला…राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहतोय अशी साद घालण्यात आली आहे.

Published on: Jul 03, 2023 09:22 AM