Special Report | शिंदे गटाची पोस्टरबाजी, दिशा वरुन घोषणाबाजी
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, आदित्य ठाकरेंना डिवचणारी पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरमध्ये आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट बसवण्यात आलं असून, त्यावर युवराजांची कायमच दिशा चुकली, असं लिहिण्यात आलंय.
मुंबई : शिंदे गटाकडून थेट मातोश्री, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरेंवरच हल्लाबोल. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, आदित्य ठाकरेंना डिवचणारी पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरमध्ये आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट बसवण्यात आलं असून, त्यावर युवराजांची कायमच दिशा चुकली, असं लिहिण्यात आलंय. आणि दिशा शब्द हा हायलाईट होण्यासाठी लाल अक्षरात दाखवण्यात आलाय. त्यामुळं विधान भवनातच नाही तर सगळीकडे अशी चर्चा सुरु झाली की ?. दिशा म्हणजे काय ?…दिशा चुकली, म्हणजे नेमकं शिंदे गटाच्या आमदारांना काय सांगायचंय. आमदार गोगावलेंचं म्हणणंय की, तुम्हाला जे समजायचं ते समजून घ्या. मातोश्रीवरुन ज्या घोषणा झाल्या, त्यावरुन भरत गोगावले आणि आदित्य ठाकरेंमध्ये वार पलटवारही झाला. पावसाळी अधिवेशन संपलंय. आता यातून सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना काय मिळालं, हे समोर आहेच. पण कामकाजापेक्षा हे अधिवेशन 50 खोक्यांच्या घोषणांवरुनच अधिक गाजलं.