रस्ता कुठे? खड्डा कुठे? मुंबई-गोवा महामार्ग बनला खड्डे मार्ग; प्रशासनाचे  दुर्लक्ष!

रस्ता कुठे? खड्डा कुठे? मुंबई-गोवा महामार्ग बनला खड्डे मार्ग; प्रशासनाचे दुर्लक्ष!

| Updated on: Aug 04, 2023 | 2:39 PM

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडलेले आहे. दरम्यान ऐन पावसाळात हा महामार्ग खड्डे मार्ग बनला आहे.

रत्नागिरी, 4 ऑगस्ट 2023 | मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडलेले आहे. दरम्यान ऐन पावसाळात हा महामार्ग खड्डे मार्ग बनला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रत्नागिरी ते संगमेश्वर महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ताच गायब झालाय. रस्ता कुठे? खड्डा कुठे? शोधण्याची चालकांवर वेळ आली आहे. खड्डे भरले जातील अशी आश्वासनं आता अनेक वेळा दिली जातात. मात्र या खड्ड्यामुळे कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असेल? त्यामुळे खड्डे मुक्त रस्ते आम्हाला कधी मिळणार असा प्रश्न कोकणी माणूस करत आहे.

Published on: Aug 04, 2023 02:39 PM