अजित पवार यांच्या वक्तव्यावर राऊत यांचा पलवार; म्हणाले, मी ग्वाही देतो... हे सरकार...

अजित पवार यांच्या वक्तव्यावर राऊत यांचा पलवार; म्हणाले, मी ग्वाही देतो… हे सरकार…

| Updated on: May 11, 2023 | 12:05 PM

राऊत म्हणाले की, अजित पवारांचं ते मत असेल. त्यांचं मत असू शकतं. ते विरोधी पक्षनेता आहेत. ते विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे. मी महाविकास आघाडीत असेल, पण शिवसेनेचा (ठाकरे गट) खासदार आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत.

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर (Power Crisis) आता काहीच वेळात निकाल येऊ शकतो. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार राहणार की पडणार या प्रश्नाने सर्वच नेत्यांची धाकधुक वाढली आहे. याचदरम्यान खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हे सरकार भक्कम आहे. ते पडणार नाही या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असतानाच हे सरकार जाणार असल्याचं म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, अजित पवारांचं ते मत असेल. त्यांचं मत असू शकतं. ते विरोधी पक्षनेता आहेत. ते विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे. मी महाविकास आघाडीत असेल, पण शिवसेनेचा (ठाकरे गट) खासदार आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत. 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अपात्र ठरतात. त्यामुळे उर्वरित 24 आमदारही अपात्र ठरतील. त्यामुळे हे सरकार क्षणभरही राहणार नाही, सरकार जाईल, अशी ग्वाही आम्ही जनतेला देऊ इच्छितो. आम्ही महाविकास आघाडीसंदर्भात अत्यंत आशावादी आहोत

Published on: May 11, 2023 12:05 PM