Special Report : शिंदे गट-भाजपमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित !
शिंदे गटाला 17 ते 18 मंत्रिपदं मिळतील अशी माहिती आहे. तर भाजपकडे 25 ते 26 मंत्रिपदे राहतील. जे अपक्ष आणि इतर छोटे पक्ष आहेत, त्यांना आपआपल्या कोट्यातून मंत्रिपंद दिली जातील. महामंडळं वाटपात फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलाय. त्यातच 2 किंवा 3 तारखेला शपथविधी होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटचे 33 मंत्री...आणि 10 राज्यमंत्री असे एकूण 43 मंत्री करता येतात आता जे अपक्ष सोबत आहेत, त्यांना मंत्रिपद आपआपल्या कोट्यातून देण्याचं ठरलंय.
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती आहे. कारण भाजप आणि शिंदे गटात(Shinde group) सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. शिंदे गटाला 17 ते 18 मंत्रिपदं मिळतील अशी माहिती आहे. तर भाजपकडे(BJP) 25 ते 26 मंत्रिपदे राहतील. जे अपक्ष आणि इतर छोटे पक्ष आहेत, त्यांना आपआपल्या कोट्यातून मंत्रिपंद दिली जातील. महामंडळं वाटपात फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलाय. त्यातच 2 किंवा 3 तारखेला शपथविधी होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटचे 33 मंत्री…आणि 10 राज्यमंत्री असे एकूण 43 मंत्री करता येतात आता जे अपक्ष सोबत आहेत, त्यांना मंत्रिपद आपआपल्या कोट्यातून देण्याचं ठरलंय, त्यानुसार बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकरांना शिंदेंनाच त्यांच्या कोट्यातून मंत्रिपदं मिळतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून बच्चू कडू शालेय शिक्षणराज्यमंत्री होते. तर राजेंद्र यड्रावकर आरोग्य राज्यमंत्री होते. आता 1 ऑगस्टनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं कळतंय..त्यात कोणाकोणाला संधी मिळणार, याचीही उत्सुकता आहे.