12 आमदार नियुक्तीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

| Updated on: Mar 21, 2023 | 10:51 AM

महाविकास आघाडीने दिलेली यादी बदलण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावेळी मविआच्या 12 आमदार नियुक्तीवर कोणताही निर्णय झाला नाही. सरकार बदलले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाविकास आघाडीने दिलेली यादी बदलण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. विधानपरिषद आमदार नियुक्तीवर कोर्टाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे.