CBI, ED चा वापर घड्याळाची टिकटिक बंद थांबविण्यासाठी होतोय; मविआच्या नेत्याचा गंभीर आरोप
2022 साली शिवसेनेत झाला आणि एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष काही नवा नाही. याच्या आधी अनेक जन या पक्षातून त्या पक्षात गेले आणि आले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे देखिल नाव येतंच. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत आपली वेगळी चूल मांडली. तसाच प्रकार 2022 साली शिवसेनेत झाला आणि एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं. पण हे सरकार सत्तेवर कसे आलं हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे. मात्र विरोध आणि खास करून ठाकरे यांची शिवसेनेकडून केंद्रीय तपास यंत्रणावरून भाजपवर आरोप केले जात असतात. आताही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी CBI, ED चा गैर वापर सुरू असून तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी केला जात आहे, असा आरोप केला आहे. त्यामुळे आधी अजित पवार आणि आता राष्ट्रवादी पक्षालाच फोडण्याचा घाट भाजपने घातल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट