Jayant patil On Midterm Elections | राज्यात मध्यावधी निवडणुक अटळ, जयंत पाटील – tv9
राज्यात मध्यावधी निवडणूक होणार असं म्हटलं आहे. त्याचबरोबर पाटील यांनी हे सध्याचं शिंदे- फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असेही म्हटलं आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाचं चेंडू सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. तो कोणाच्या बाजूने जाणार हे निर्णय आल्यावरच समजणार आहे. मात्र त्या आधिच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राज्यातील जनतेसह अनेक राजकीय नेत्यांचे कान उभे राहीले आहेत. जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात अपात्र आमदारांच निलंबन होणार. तर राज्यात मध्यावधी निवडणूक होणार असं म्हटलं आहे. त्याचबरोबर पाटील यांनी हे सध्याचं शिंदे- फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असेही म्हटलं आहे. त्याचबरोबर जयंत पाटलांनी असंही म्हटलेलं आहे की, शिंदे गटापेक्षा भाजप आमदारांमध्येच मंत्रीपदावरून अधिक अस्वस्थता आहे.
Published on: Aug 28, 2022 09:41 AM
Latest Videos