Ganesh Chaturthi 2023 | सिद्धिविनायक पावला, भक्ताने हिरेजडीत सोन्याचा मुकुट दान केला

Ganesh Chaturthi 2023 | सिद्धिविनायक पावला, भक्ताने हिरेजडीत सोन्याचा मुकुट दान केला

| Updated on: Sep 20, 2023 | 8:50 PM

गणेशोत्सव काळात प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीला भाविकांची मोठी रांग लागली आहे. भक्तांकडून सिद्धिविनायक मंदिरात भक्तांकडून मिळणाऱ्या दानात यंदा विलक्षण वाढ झाली आहे. सोना चांदीच्या दागिन्यांनी बाप्पाची दानपेटी भरून वाहत आहे.

मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपतीला एका भक्ताने तब्बल पाऊण किलो सोन्याचा हिरेहिरेजडीतांनी मढविलेला मुकुट अर्पण केलाय. सिद्धिविनायक बाप्पाच्या दरबारी एका भक्ताची मनोकामना पूर्ण झाली. त्यामुळे त्या निनावी भक्ताने सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी पाऊण किलोचा सोन्याचा मुकुट दान केला आहे. दान करण्यात आलेल्या मुकुटाची किंमत ही लाखोंच्या घरात असल्याचे बोललं जातंय. भाविकाने हा मुकुट दान केल्यांनतर त्याला श्रींच्या डोक्यावर हा मुकुट ठेवण्यात आला. हा मुकुट पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. सिद्धीविनायक मंदिरात मंगळवारी मोठी गर्दी असते. तर, गणेशोत्सव दरम्यान सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची मोठी रांग लागते. सिद्धिविनायक मंदिरात भक्तांकडून मिळणाऱ्या दानात यंदा विलक्षण वाढ झाली आहे. सोना चांदीच्या दागिन्यांनी बाप्पाची दानपेटी भरून वाहत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.

Published on: Sep 20, 2023 08:50 PM