असाही वारकरी; पोलिओमुळे अपंगत्व, तरी 11 वर्षांपासून करतायत पंढरीची वारी
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची, देशाची धार्मिक आणि सामाजिक संस्कृती आहे. या वारीत भेदभाव विसरून मिळून मिसळून, फुगडी खेळत अनेकजण सहभागी होतात.पंढरपूरला येणारा बहुतांश वर्ग हा शेतकरी, सर्व सामान्य कुटुंबातील आहे. दरम्यान यंदाच्या वारीत अंपग वारकरी मोठ्या श्रद्धेने आणि भावनेने सहभागी झाले आहेत.
पुणे : पंढरीची वारी ही महाराष्ट्राची, देशाची धार्मिक आणि सामाजिक संस्कृती आहे. या वारीत भेदभाव विसरून मिळून मिसळून, फुगडी खेळत अनेकजण सहभागी होतात. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. पंढरपूरला येणारा बहुतांश वर्ग हा शेतकरी, सर्व सामान्य कुटुंबातील आहे. यंदाही लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान या वारीत अंपग वारकरी मोठ्या श्रद्धेने आणि भावनेने सहभागी झाले आहेत. जन्मतः पोलीओ असल्यानं अपंग असलेले वारकरी प्रदीप मुजूमले पंढरपूरची वारी करत आहेत. पायानं चालता येत नसल्यानं हातात चप्पल घालत हातावर चालत ते वारी करत आहे. गेल्या 11 वर्षापासून ते पंढरपूरची वारी करत आहेत. विठूरायाची ओढ असल्यानं प्रदीप दरवर्षी ही वारी कशी करतात, यासाठी पाहा यासंदर्भातील व्हिडीओ…