किसान सन्मान निधीला योजनेला बसली खीळ! ‘या’ जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना बसणार फटका; कारण काय बघाच
पंतप्रधान किसान सन्मान निधीला मुकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने वार्षिक सहा हजारचा निधी दिला जातो. हा निधी थेट खात्यावर तीन टप्प्यात दिला जात आहे. मे महिन्यात या निधीचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
भंडारा : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच आपले बँक किंवा पोस्ट खात्यांशी आधार संलग्न करणे गरजेचे असते. ज्यांनी ते संलग्न केलं त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. मात्र ज्यांनी असं केलं नाही त्यांना आता चांगलाच फटका बसल्याचे जिल्ह्यात पहायला मिळत आहे. जिल्ह्यात 3 हजार 83 शेतकऱ्यांपैकी तब्बल 18 हजार 173 शेतकऱ्यांनी आपले पोस्ट खाते आधारशी संलग्न केलेले नाही. त्यामुळे हे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीला मुकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने वार्षिक सहा हजारचा निधी दिला जातो. हा निधी थेट खात्यावर तीन टप्प्यात दिला जात आहे. मे महिन्यात या निधीचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. पोस्ट विभागात खातेदार असलेल्या 30 हजार 83 शेतकऱ्यांपैकी 11 हजार 910 शेतकऱ्यांनी आपले पोस्ट खाते आधारशी लिंक केले आहे. मात्र 18 हजार 173 शेतकऱ्यांनी पोस्ट खाते आधारशी लिंक केलं नाही. त्यामुळे या योजनेला ते मुकण्याची शक्यता आहे. आज 13 मे असून 15 मे शेवटची तारिख आहे. त्यामुळे ज्यांनी अद्यात पोस्ट खाते आधारशी लिंक केलं नाही. त्यांनी संधी आहे. वेळ न घालवता हे काम करून घ्या आणि योजनेचा लाभ उठवा.