अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं कारण काय? पाहा काय म्हणाले प्रफुल्ल पटेल…
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काल अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पवार आणि शाहा यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काल अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील बैठकीत उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले. दरम्यान, दिल्लीत दाखल झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं. अजित पवार हे दिल्लीला का गेले? अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याने मंत्रिमंडळाचा तिढा सुटणार का? यासंदर्भात प्रफुल्ल पटेल काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 13, 2023 08:48 AM
Latest Videos