“मी शरद पवार यांना फोन करणार, पण आता मागे वळून बघणार नाही”, प्रफुल्ल पटेल यांची भूमिका
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी बंडखोरी केली. प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. अजित पवार जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा अनेकांना वाटलं होतं की प्रफुल्ल पटेल हे त्यांच्यासह जाणार नाहीत. मात्र प्रफुल्ल पटेलही तिथे दिसलेच.
मुंबई: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी बंडखोरी केली. प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. अजित पवार जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा अनेकांना वाटलं होतं की प्रफुल्ल पटेल हे त्यांच्यासह जाणार नाहीत. मात्र प्रफुल्ल पटेलही तिथे दिसलेच. त्यानंतर आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने तुम्ही त्यांना भेटणार का? हे विचारलं असता “शरद पवार माझे गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद मी नेहमीच घेत असतो”, असं उत्तर पटेल यांनी दिलं आहे. “तसेच गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी मी शरद पवार यांना फोन करणार आहे. येत्या दहा दिवसांत भविष्यातील वाटचालीसंदर्भात भूमिका स्पष्ट होणार आहे. कायदेशीर कारवाईचा आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही. आता मागे वळून बघणार नाही,” असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Published on: Jul 03, 2023 03:57 PM
Latest Videos